निधन वार्ता! संकेत अशोक पवार यांचे आकस्मित निधन
भोर : सारोळा ता. भोर येथील संकेत अशोक पवार यांचे गुरूवार दि. २६ रोजी सायंकाळी ८:३० वाजता आकस्मित निधन झाले ते ३० वर्षाचे होते. सारोळा गावच्या आध्यात्मीक व सामाजीक विकासात ते सतत सहभाग घेत असत. गावातील लोकांच्या सुखदुःखात व सामाजीक कामात त्यांचा मोठा सहभाग होता. गावातील आणि पंचक्रोशीतील तरूण युवकांसोबत त्यांचे मैत्रीपूर्ण अत्यंत सलोख्याचे संबंध होते.तरुणांचा आधारवड हरपल्याची मित्रांची प्रतिक्रिया आहे. त्यांच्या अकस्मात जाण्याने गावामध्ये व पवार परिवार तसेच अबालवृध्दांमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या मागे आजी, आई, वडील,भाऊ, वहिनी असा परिवार आहे.