लहूनाना शेलार यांचा वाई तालुक्यात गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटपांचा उपक्रम …
वाई : लहूनाना शेलार युवा मंचातर्फे विद्यार्थी, शेतकरी यांसाठी वारंवार सामाजिक उपक्रम राबविले जातात. समाजातील हुशार, गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शिक्षण घेता यावे यासाठी ते कायम अग्रेसर असतात.नुकत्याच २४ ऑगस्ट रोजी झालेल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी विद्यार्थ्यांना सायकल वाटप, शेतकऱ्यांसाठी औषध फवारणी यंत्र, कुटी मशीन, गोठ्यातील मॅट असे उपक्रम राबवले होते. काही राजकीय व्यक्तींचे काम फक्त मतदार संघांपूरते मर्यादित असते. लाहूनाना शेलार(माजी सभापती,भोर)यांचे काम मतदार संघा पुरते मर्यादित नसून जिथे गरजू व्यक्ती आहेत तिथे हमखास होते. वाई तालुक्यातील गडगेवाडी येथील दत्ता धायगुडे यांनी लहुनाना शेलार यांच्या शी संपर्क साधला. ते बोलले की नवनाथ हिरवे हे गावातील गरजू जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ३२ विद्यार्थ्यांनचे गावातील मंदिरात एक्स्ट्रा क्लासेस घेतात.त्या मुलांची परिस्थिती नाजूक आहे. त्यांना शाळेतील अभ्यासासाठी वह्या लागत आहेत. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सोमवार(दि.२३ ऑक्टोबर) गडगेवडी(ता.वाई) या गावात जाऊन वह्या वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला. यावेळी २०० पेक्षा अधिक वह्या वाटल्या गेल्या.या कार्यक्रमा वेळी स्वतः लहुनाना शेलार उपस्थित होते. तसेच लहुनाना शेलार युवा मंचाचे अध्यक्ष पप्पू हजारे,उपाध्यक्ष तुषार मालुसरे,कार्याध्यक्ष नामदेव बुधे,धांगवडी चे सरपंच आप्पा होनमाने,वाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव आण्णा हिरवे,दत्ता धायगुडे , विद्यार्थि आणि ग्रामस्थ उपस्थित होते.