जागतिक स्ट्रोक दिनापूर्वी पुणे शहर पोलिसांकडून योग सत्राचे आयोजन…
पुणे : पुण्यातील खासगी रुग्णालय आणि शहर पोलिसांनी जागतिक स्ट्रोक दिनानिमित्त आज शनिवारी शिवाजी नगर पोलिस कॅम्पमध्ये विशेष योग सत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ७०० हून अधिक लोक उपस्थित होते. स्ट्रोक टाळण्यासाठी आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगाच्या महत्त्वावर प्रकाश टाकणे हा या जनजागृती मोहिमेचा उद्देश होता.
जागतिक स्ट्रोक दिनाचे महत्त्व ओळखून, रुबी हॉल क्लिनिक योग आणि स्ट्रोक प्रतिबंधक यांच्यातील महत्त्वाच्या दुव्यावर भर देते.रुग्णालयाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुर्वेझ ग्रँट यांनी या कार्यक्रमाविषयी आपले विचार व्यक्त केले, ते म्हणाले, “जागतिक स्ट्रोक दिन कार्यक्रमासाठी पुणे पोलीस विभागासोबतचे आमचे सहकार्य हे संरक्षकांच्या आरोग्यासाठी आणि हितासाठी आमची बांधिलकी दर्शवते.