कापूरहोळ येथील मटका अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; २ जणांवर गुन्हा दाखल
कापूरहोळ : राजगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापूरहोळ(ता.भोर) येथे पोलिसांनी एका मटका अड्ड्यावर कारवाई केली असून १०८६ रुपयंचा मुद्देमाल जप्त करत, २ जणां विरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम चे कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकात गूरूलिंगअप्पा बिराजदार (वय ४२ वर्षे, सध्या रा. रॉयल वूड सोसायटम् बस स्टैंड जवळ, सासवड. मूळ रा. शिवाजी चौक उदगिर,ता. उदगिर, जि.लातूर) आणि बाळू गुलाब बोरकर (वय ७० वर्षे, रा विठठलनगर, हरिश्चंद्री ता. भोर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. ही कारवाई शुक्रवारी (दि. १९ जानेवारी) कऱण्यात आली.
पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली की, राजगड पोलीस स्टेशन हद्दीतील कापूरहोळ येथील श्री दत्त हॉटेलच्या पाठीमागे पत्राशेडमध्ये काही इसम अवैधरित्या मटका अड्डा चालवत आहेत. त्यानुसार त्यांनी राजगड पोलिसांचे एक पथक लगेचच कापूरहोळच्या दिशेने रवाना केले. यावेळी पथकाने घटनास्थळी टाकलेल्या छाप्यामध्ये त्यांनी २ कॅलक्यूलेटर, चिमणी पाखरू चित्र असलेला चार्ट आणि रोख रक्कम असा एकूण १०८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार दिनेश गुंडगे करीत आहेत.