शिवतीर्थ भोर चौपाटी येथे मनोज जारांगे पाटलांच्या समर्थनार्थ विराट सभा…उद्यापासून मराठा आरक्षणा साठी बेमुदत साखळी उपोषणास सुरुवात
भोर : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे याविषयी सुरु असलेल्या उपोषण आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भोर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने शिवतीर्थ चौपाटी येथे रविवार (दि.२९ ऑक्टोबर) पासून बेमुद्दत उपोषण सरू करण्यात येणार आहे.
भोर तालुक्यातील बऱ्याच गावांमधून राजकीय पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केल्याचे बोर्ड लावण्यात आले आहेत. तालुक्यातील अनेक गावातून मराठा आरक्षण संदर्भात साखळी उपोषणासह वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने रविवार (दि.२९ऑक्टोबर) रोजी बेमुद्दत साखळी उपोषण सुरु केले जाणार असून, मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ करण्यात येत असलेले बेमुद्दत साखळी उपोषण आरक्षण मिळाल्या शिवाय थांबवणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.
भोर तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील मराठा समाजातील सामाजिक,राजकीय, शैक्षिणीक, प्रसार माध्यम,कामगार संघटना,व्यापारी उघोजक,तरुणांसह सर्वच क्षेत्रातील समाजबंधवांकडून मोठ्याप्रमाणावर पाठींबा मिळत असल्याचे दिसून आले.
भोर तालुक्यातील सकल मराठा समाजाकडून गेली ४ दिवस गावोगावी फिरून याबाबत सभा घेतल्या जात आहेत. त्यासाठी सगळी कडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला जात आहे. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचा सहभाग यामध्ये होताना दिसत आहे.उद्या होणाऱ्या उपोषणात तालुक्यातील बहुतेक गावातील भजनी मंडळ भजन सादर करणार आहेत. तसेच छत्रपाती संभाजी नगर मधील देवराई पायगा येथील सरपंच मंगेश साबळे हे ही येत्या दोन दिवसात भोर येथील साखळी उपोषणास पाठिंबा देण्यासाठी भेट देणार असल्याचे सकल मराठा समाज बांधवांकडून सांगण्यात आले.