वेल्हा तालुक्यातील निवी-गेव्हंडेच्या सरपंचपदी सुनिता खुटेकर
वेल्हा: ग्रुप ग्रामपंचायत निवी-गेव्हंडेच्या सरपंचपदी सुनिता दिनेश खुटेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.माजी सरपंच अश्विनी जोगडे यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पद रिक्त झाले होते.सरपंच पदासाठी सुनिता खुटेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. गावच्या विकासासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.गावातील सर्व समस्या व ग्रामस्थांच्या प्रश्नांला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच सुनिता खुटेकर सांगितले.फडणवीस- शिंदे सरकारने सुरू केलेल्या शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सरपंचांच्या माध्यमातून गावात मिळवून देणार असल्याचे देवेंद्र खुटेकर यांनी सांगितले. यावेळी निवडणुक अधिकारी म्हणून मंडल अधिकारी तिर्थगीरी गोसावी,ग्रामसेवक आर.एम.मुरमे यांनी कामकाज पाहीले.
नवनिर्वाचित सरपंच सुनिता खुटेकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच आश्विनी जोगडे, उपसरपंच विकास कडू, ग्रा.सदस्य दिपक खुटेकर ज्येष्ठ नेते गणपत गोऱ्हे, ग्रा.प. सदस्य एकनाथ गोऱ्हे, शांताबाई गायकवाड उपस्थित होते.