भोर विधानसभा मतदार संघात आज विशेष ग्रामसभा
भोर : भारत निवडणूक आयोग व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशानुसार २०३ भोर मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये आज मंगळवार (ता.७ नोव्हेंबर) रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ .राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा भाग म्हणून ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या या ग्रामसभेत मतदार नोंदणी, नावात दुरुस्ती-वगळणी व आधार जोडणी करण्यात येणार आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भोर राजेंद्र कचरे यांनी दिली.
मागील आठवड्यात २७ ऑक्टोबरला मतदासंघांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर यादीमध्ये ज्यांची नावे आलेली माहीत त्यांना नऊ डिसेंबरपर्यंत हरकती तसेच नाव नोंदणी करण्याची संधी आहे. याचाच भाग म्हणून मतदारसंघातील सर्व यादी भागात आज विशेष ग्राम सभेने आयोजन करण्यात आले आहे. ५ जानेवारी २०२४ ला सदर यादी अंतिमरीत्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
अंतिमरीत्या प्रसिद्ध झालेली यादी हीच पुढील वर्षी होणारे विविध निवडणुकांसाठी वापरले जाणार असल्याने ती महत्त्वाची आहे. त्यामुळे पात्र मतदार महाविद्यालयीन युवक युवती, नव्याने लग्न होऊन आलेल्या महिला भगिनी व विविध भागात नाव नोंदणी न केलेले नागरिक यांनी मतदार यादीत जास्तीत जास्त नावनोंदणी करावी असे भोर चे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.