गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना; नीरा येथे नराधम शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
नीरा : गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नीरा (ता. पुरंदर) येथे घडली आहे. एका शिक्षकाने त्याच्याकडेच शिकवणीसाठी येणाऱ्या अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची अत्यंत घृणास्पद घटना घडली आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्या खासगी शिकवणीच्या नराधम शिक्षकास अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार, नीरा (ता.पुरंदर) वार्ड क्रमांक एक मध्ये ज्ञानदिप कोचिंग क्लासेस मध्ये शिकवण्याचे काम करणाऱ्या सुनील विश्वनाथ चव्हाण (सद्या रा. निरा ता. पुरंदर. मूळ रा. खोजेवाडी ता. जि. सातारा) याच्या विरोधात फिर्याद देण्यात आली आहे. त्याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलगी ही त्याच्या खासगी शिकवणीत शिक्षणासाठी जात होती. त्याने प्रथम मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. दि.१ मे २०२३ रोजी दुपारी एका वाजल्यानंतर क्लासच्या आतील खोलीत आरोपीने, तु मला आवडतेस, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, आपण लग्न करू असे म्हणून जवळ ओढुन घेवुन विनयभंग केला. त्यांनतर साधारण ८ दिवसांनी क्लास संपल्यावर साधारण दुपारी १ नंतर आरोपी सुनिल चव्हाणने तिला कोचिंग क्लासेसच्या सर्व मुली निघुन गेल्यानंतर थांबवुन घेतले. व तीला शिकवण्याचे रूम सोडुन दुसऱ्या रूममध्ये तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. मुलीने विरोध केल्यावर काही एक न ऐकता जबरदस्तीने शारीरीक संबध ठेवले. त्यानंतरही तीला नापास करण्याची धमकी देउन शारीरीक संबध ठेवले. असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेमुळे पालकांनी प्रचंड तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेने निरा परिसरात खळबळ उडाली आहे. सदर घटने बाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे करीत आहेत.