सद्गुरू कृपा डेव्हलपर्स च्या सारोळ्यातील रेडी मिक्स काँक्रीट प्लांटचे उद्घाटन संपन्न
सारोळा : भोर तालुक्यातील सारोळा येथे सद्गुरू कृपा डेव्हलपर्स च्या रेडी मिक्स काँक्रीट प्लांटचे उद्घाटन शुक्रवार (दि.१ डिसेंबर) रोजी करण्यात आले. भोर तालुक्यातील आरएमसी प्लांटची गरज लक्षात घेऊन सद्गुरू कृपा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा नितीन ओहाळ तसेच त्यांचे बंधू महेंद्र ओहाळ यांनी हा प्लांट उभा केला आहे. अतिशय कठीण परिस्थितीतून सुरू झालेल्या सद्गुरू कृपा डेव्हलपर्सच्या रोपट्यापासून वटवृक्षा पर्यंत च्या प्रवासात ओहाळ बंधूची मेहनत खूप आहे. उत्तम दर्जाचे काम हे सद्गुरू कृपा डेव्हलपर्सचे प्रमुख उद्दिष्ट असते. आजच्या युगातील काँक्रीट रस्त्याची वाढलेली मागणी डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी काळाची गरज ओळखून या प्लांट ची स्थापना केली असल्याचे ओहाळ बंधूंनी या वेळेस सांगितले.
या कार्यक्रम प्रसंगी आमदार संग्राम थोपटे, आमदार मकरंद पाटील यांचे जेष्ठ बंधू मिलिंद पाटील, सातारा जि. प. चे माजी अध्यक्ष उदय कबुले, चिक फिडचे मॅनेजर कोंडे, राजेंद्र तांबे, शामराव गाढवे, अतुल पवार, यशवंत चव्हाण, रविंद्र सोनावणे, पोपट मरगजे, सचिन मरगजे, सुजितसिंह शेळके, पै नवनाथ शेंडगे, दयानंद धायगुडे, विशाल धायगुडे, राजेंद्र धायगुडे, सत्यजित धायगुडे, संदिप धायगुडे, भिवराव बोराटे, नागेश ननावरे, संजय ननावरे, रोहन आवारे, संतोष बावकर, प्रविण पवार आदी उपस्थित होते.