भोर विधानसभा मधील मतदार यादीमध्ये नाव नोंदणीची अंतिम मुदत ९ डिसेंबर

भोर : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भोर विधानसभा मतदार संघातील मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत नागरिकांकडून दावे, हरकती म्हणजेच मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदणीची दुरुस्ती व नावे वगळण्यासाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे, तसेच त्यात नागरिकांचा सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने विशेष शिबिरांचे आयोजनही करण्यात येत आहे.

भोर विधानसभा मधील नागरिक, महिला, दिव्यांग, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीसह दावे व हरकतींसाठी ९ डिसेंबर २०२३ ही अंतिम मुदत असून, या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन निवडणूक शाखा तहसील कार्यालय भोर वेल्हा मुळशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी नवयुवकांची भूमिका महत्त्वाची असून, मतदान प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. जास्तीत जास्त युवकांची मतदार नोंदणी व्हावी यासाठी प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

Advertisement

संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ साठी ९ डिसेंबर २०२३ हा दावे, हरकती व मतदार नोंदणीचा अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिवस असून, भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरमन, संचालक सेवा सोसायटी, सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक , सर्व गणेश  मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, गावातील मुंबई-नवी मुंबई भागातील गावकरी मंडळाचे अध्यक्ष-सदस्य (गाळे धारक) या सर्वांनी नागरिकांमध्ये अधिकाधिक मतदान नोंदणी होईल याबाबत आवाहन करून जनजागृतीबाबत व या कार्यक्रमात सहभाग घेऊन १८-१९ वर्षांवरील सर्व युवक-युवतींची मतदार नोंदणी करून घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. नाव नोंदणीसाठी प्रत्येक गावातील बीएलओ (शाळेचे शिक्षक) यांना संपर्क करावे किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत संपर्क करावा. तसेच ऑनलाईन पद्धती ने नाव नोंदणी Voter Helpline App किंवा NVSP portal द्वारे करता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page