राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) यांनी केले कापूरहोळ दुभाजकवरील “क्रॅश बॅरिअर” चे नूतनीकरण; भोर तालुका युवासेना प्रमुख स्वप्नील गाडे यांच्या मागणीची घेतली दखल
कापूरहोळ : पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ (ता.भोर) येथील मुख्य चौकातील रस्त्यावर असणाऱ्या दुभाजकवरील “क्रॅश बॅरिअर” हे मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या ट्रक आणि कारच्या अपघातात तुटले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक असणाऱ्या या महामार्गावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) अधिकाऱ्यांनी तातडीने “क्रॅश बॅरिअर” चे नूतनीकरण करून योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी भोर तालुका युवासेना प्रमुख स्वप्नील गाडे यांनी वाहतूक पोलीसांमार्फत केली होती.
या मागणीची दखल घेत एनएचएआई अधिकाऱ्यांनी नूतनीकरण करून नवीन “क्रॅश बॅरिअर” बसवून दिले. एनएचएआई अधिकारी व वाहतूक पोलीस यांचे भोर तालुका युवासेना प्रमुख स्वप्नील गाडे यांनी आभार मानले. यावेळी वाहतूक पोलीस हवालदार राऊत, पो. ह. काळे, सागर दरेकर, भोर तालुका आर पी आय(A) अध्यक्ष सुनिल गायकवाड, उपाध्यक्ष स्वानील सावंत, विनोद भोसले, दत्तात्रय गाडे, राहुल गाडे, राजू वाघमारे, अभय बाठे इ. उपस्थित होते.
वाढते अपघात पाहता दुभाजकावर जाळी बसवण्याची मागणी
पुणे-सातारा महामार्गावरील कापूरहोळ (ता.भोर) येथील मुख्य चौकातील रस्ता क्रॉस करतानाचे वाढते अपघात पाहता, लवकरच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआई) यांच्याकडे दुभाजकावर जाळी बसवण्याचे निवेदन देणार असल्याचे भोर तालुका युवासेना प्रमुख स्वप्नील गाडे यांनी यावेळी सांगितले.