सारोळा-वीर रस्त्यावर गॅसच्या टाक्यांची वाहतूक करणाऱ्या पिकअप गाडीचा अपघात
सारोळा : सारोळा-वीर मार्गावरील पांडे (ता.भोर) गावच्या हद्दीत गॅस च्या टाक्यांनी भरलेल्या पिकअप गाडीचा टायर फुटल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना घडली आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, सारोळा-वीर मार्गावर गॅस च्या टाक्यांनी भरलेली पिकअप (एम. एच. १२ वाय. टी. ९७६५) ही गाडी वीर वरून सारोळ्याच्या दिशेने मंगळवार (दि.१६ जानेवारी) सकाळी ११ च्या सुमारास येत असताना पांडे (ता.भोर) गावच्या हद्दीत आली असता, गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले, त्यामुळे गाडी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन चारीमध्ये पलटी झाली. गाडीमध्ये भरलेल्या गॅसच्या टाक्याही होत्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. सध्या गाडीतील भरलेल्या गॅसच्या टाक्या दुसऱ्या गाडी मध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.