अंतिम मतदार यादी जाहीर! महाराष्ट्रात ९ कोटी १२ लाख मतदार, भोर विधानसभा मतदार संघात ३ लाख ९७ हजार ८४५ मतदार; महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची आकडेवारी वाचा सविस्तर

पुणे : निवडणूक आयोगाद्वारे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येऊन मंगळवारी (दि. २३ जानेवारी) मतदार यादी अंतिम करण्यात आली. ही यादी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रावर तसेच निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मतदारांनी या यादीत आपले नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी. आपल्या तपशीलात काही बदल करायचा असल्यास विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. यादीच्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया निरंतर सुरु राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

राज्याची एकूण स्थिती काय?

ऑक्टोबर २०२३ प्रारुप मतदार यादीत २४ लाख ३३ हजार ७६६ मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच २० लाख २१ हजार ३५० मतदारांची नावे वगळण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये ४ लाख १२ हजार ४१६ मतदारांची निव्वळ वाढ होऊन एकूण मतदारांची संख्या ९ कोटी १२ लाख ४४ हजार ६७९ इतकी झाली आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये ६ लाख ७० हजार ३०२ मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच २० ते २९ या वयोगटात ८ लाख ३३ हजार ४९६ मतदारांची वाढ झालेली आहे.

पुणे जिल्ह्याची स्थिती काय?

Advertisement

पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी (दि. २३जानेवारी) जिल्ह्यातील मतदारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. या यादीत विधानसभानिहाय एकूण मतदारांची संख्या देण्यात आली आहे. या यादीतील मतदारांच्या आकडेवारीवरून चिंचवड हा जिल्ह्यात सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्यातील २१ पैकी १४ विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, उर्वरित सात विधानसभा मतदार संघातील मतदारांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे.

मतदारांची संख्या वाढलेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये हडपसर, खडकवासला, कोथरूड, वडगाव शेरी, भोसरी, पिंपरी, चिंचवड, मावळ, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, खेड आणि शिरूर आदींचा तर, मतदार संख्या कमी झालेल्या मतदारसंघांमध्ये जुन्नर, आंबेगाव, दौंड, कसबा, कँटोन्मेंट, पर्वती आणि शिवाजीनगर या सात मतदारसंघांचा समावेश आहे.

विधानसभा मतदारसंघ निहाय मतदारांची आकडेवारी –

जुन्नर – ३ लाख ८ हजार ४३९
आंबेगाव – २ लाख ९८ हजार ५९८
राजगुरुनगर (खेड) – ३ लाख ४५ हजार ३५
शिरूर – ४ लाख २९ हजार ८१८
दौंड – २ लाख ९९ हजार २६०
इंदापूर – ३ लाख १८ हजार ९२४
बारामती – ३ लाख ६४ हजार ४०
पुरंदर – ४ लाख १४ हजार ६९०
भोर – ३ लाख ९७ हजार ८४५
मावळ – ३ लाख ६६ हजार ७७९
चिंचवड – ५ लाख ९५ हजार ४०८
पिंपरी – ३ लाख ६४ हजार ८०६
भोसरी – ५ लाख ३५ हजार ६६६
वडगाव शेरी – ४ लाख ५२ हजार ६२८
शिवाजीनगर – २ लाख ७२ हजार ७९८
कोथरूड – ४ लाख १ हजार ४१९
खडकवासला – ५ लाख २१ हजार २०९
पर्वती – ३ लाख ३४ हजार १३६
हडपसर – ५ लाख ६२ हजार १८६
पुणे कॅंटोन्मेंट – २ लाख ६९ हजार ५८८
कसबा पेठ – २ लाख ७२ हजार ७४७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page