खेड शिवापूर येथील प्रख्यात जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा
खेडशिवापुर: राजगड पोलिसांना आज शनिवार (दि.२८ ऑक्टोबर) रोजी खेडशिवापूर ता.हवेली,जि.पुणे गावचे हददीत गार्गी हॉटेलच्या पाठीमागे जुगार व्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार राजगड पोलिसांची एक टीम घटना स्थळी रवाना झाली. तिथे गेल्यावर त्यांच्या असे निदर्शनास आले की, खेडशिवापूर गावचे हददीत गार्गी हॉटेलच्या पाठीमागील बाजूच्या असणारया पत्राशेड जवळील झाडाच्या सावली खाली जूगार मालक शंकर भगत स्वतःचे अर्थिक फायदयाकरिता जूगार व्यवसाय चालवत असल्याचे दिसून आले.
त्यामधे अजून काही व्यक्ती रम्मी नावाचा पत्यांचा जुगार पैशावर स्वतःचे अर्थिक फायदयाकरिता खेळत व खेळवित असतांना मिळुन आले. त्यामधे व्यंकट बाबूराव मूरमे (वय ६२ वर्षे, धंदा मार्बल दूकान रा सूखसागर कात्रज पूणे),धर्मेंद्रत्रिभूवन प्रसाद (वय ४३ वर्षे, धंदा मजूरी रा गुलमोहर बिल्डींग बालाजीनगर,कात्रज पुणे),विजय जयंवत जगताप (वय ३८ वर्षे, व्यवसाय डायव्हर रा खेडशिवापूर ता हवेली जि पुणे), शंकर भगत (रा सोनवडी ता भोर जि पुणे) आणि अजून ७ ते ८ इसम नावे व पत्ता माहित नाही, या सर्व व्यक्ती आढळून आल्या. यांच्या विरुद्ध राजगड पोलिसांनी मुंबई जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे सदर व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास राजगड पोलिस स्टेशन चे पोलीस अंमलदार खेंगर करत आहेत.