पुरंदर ते धनुषकोडी १५०० किमी सायकल प्रवास अवघ्या आठ दिवसात यशस्वीपणे पूर्ण

सासवड : प्रभु श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून पुरंदर सायकलिस्ट क्लबने २५ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२४ रोजी पुणे (पुरंदर) ते धनुषकोडी (रामसेतू) ही १५०० किमीची दक्षिण भारत सायकल मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेत एकूण तेरा सायकलिस्ट सहभागी झाले होते.

इंडो ॲथलेटिक्स सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवतीर्थ-पुरंदर येथून मोहिमेला सुरुवात झाली. पुणे ते सोलापुर अल्मट्टी डॅम, हंपी, राजा रामदेव यांची कृष्णगिरी भूमी, करूर, मीनाक्षी मंदिर-मदुराई, रामेश्वरम ते भारत भूमीचे शेवटचे टोक असलेले रामसेतू म्हणजेच धनुषकोडी असा आठ दिवसांचा हा सायकल प्रवास होता.

Advertisement

धनुषकोडी-दक्षिण भारत मोहिमेत सासवड, हडपसर, कात्रज, वडगाव शेरी आणि पुणे शहर परिसरातून संतोष झेंडे, शंतनू निगडे, मनोज मेमाणे, सुहास गदादे, ललित वाल्हेकर, संकेत नंदवंशी, सुजित बाठे, राहुल घुले, पी.एस.आय पृथ्वीराज आबा शिंदे, अनिल सणस, प्रसन्न कुलकर्णी, अशोक पाटील, शिवराज चिमलगीकर असे एकूण तेरा सायकलस्वार सहभागी झाले होते.

पुरंदर ते धनुषकोडी सायकल मोहिमेसाठी इंडो एथलेटिक सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष गजानन खैरे, अजित पाटील, गणेश भुजबळ, गिरीराज उमरीकर, श्रेयस पाटील, तसेच पुरंदर सायकलिस्ट क्लबचे अजित झेंडे, केतन जगताप, विनायक चाळेकर, महेश बडदे, सतिश कुरपड, युवराज काळे, आकाश बडदे, गौरव बडदे, सेलम सायकल क्लब, जयकन्नू सुंदररज्जू सर, डिकथलाँन-बेंगलोर सिटी, बिष्णु शर्मा, नासा सायकल्स हडपसरचे नरेंद्र गुप्ता, मोरया सायकल्स-सासवडचे प्रविण बोरावके यांचे विशेष सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page