भोर तालुका भाजपा युवा मोर्चा तर्फे भोर गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांना निवेदन.
भोर : भारत सरकारच्या महत्वकांक्षी योजने पैकी एक असणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढून घेण्यासाठी अनेक खाजगी एजंसी कडून ५० रुपयांपासून २०० रुपये पर्यंत सर्वसामान्य लोकांकडून पैसे आकारले जात आहेत. वास्तविक पाहता प्रत्येक गावातील आशा सेविका ग्रामपंचायत ऑपरेटर यांनी हे कार्ड मोफत काढून दिले पाहिजे या संदर्भात भोर चे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांना प्रत्यक्षात भेटून आज निवेदन देण्यात आले. व ज्या त्या गावामध्येच मोफत आयुष्यमान भारत कार्ड काढून देण्याच्या सूचना व व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात याव्या अशी मागणी भोर तालुका भाजप युवा मोर्चा तर्फे केली. यावेळी भोर तालुका भाजपा युवा मोर्चा चे अध्यक्ष अमर बुदगुडे, उपाध्यक्ष अमोल पिलाने,सौरभ राऊत,रोहन खोपडे व पदाधिकारी उपस्थित होते.