सुहास दिवसे पुण्याचे नवे जिल्हाधिकारी, डॉ. राजेश देशमुख यांची बदली
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीआधी प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. शिंदे सरकारकडून राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. काही दिवसांपूर्वीच आयपीएस अधिकारी अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.
तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव यांचीही बदली करण्यात आली होती. यानंतर आता जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्रीडा व युवक सेवा आयुक्त पदावर दिवसे कार्यरत होते आता त्यांच्या जागेवर राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.