सासवड “ईव्हीएम” चोरी प्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, डी.वाय.एस.पी निलंबित

सासवड : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील मधून ‘ईव्हीएम’मधील कन्ट्रोल युनिटची चोरी झाल्याने खळबळ उडाली होती. याची तत्काळ दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे.

या प्रकरणी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नाही तर तिन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित केल्यानंतर त्याचा अहवाल तत्काळ केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्याचा आदेश दिला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) या प्रकरणी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे. त्यानंतर मुख्य सचिवांनी या प्रकरणी पुण्याचे जिल्हाधिकारी (Collector) आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनीही तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

EVM मशीनमधील कन्ट्रोल युनिटच्या चोरीनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हालवली. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी २४ तासांतच दोघांना अटक केली. या दोघांना जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील माळशिरस मधून अटक करण्यात आली आहे. तरीही प्रश्न उपस्थित होतोय की या चोरांनी EVM मशीनमधील कन्ट्रोल युनिटची चोरी का केली? यातून चोरांना काय साध्य करायचे होते, याची उत्तरे पोलीस शोधत आहेत.

EVM मशीन असलेल्या स्ट्राँग रूमबाबत हलगर्जीपणा दाखवण्यात आल्याचा ठपका तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांच्यावर ठेवला आहे. या संदर्भातील विस्तृत अहवाल १२ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत देण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सचिवांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिला आहे.

दरम्यान, पुणे काँग्रेसने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. EVM मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ तसेच तारीख प्रसिद्ध करावी, अशी मागणी काँग्रेसने या याचिकेत केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page