कोंडावळे(वेल्हे) येथून १५ वर्षीय मुलगी बेपत्ता
वेल्हे(प्रतिनिधी) : वेल्हे तालुक्यातील कोंडावळे येथून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली आहे. याबाबत वेल्हे पोलीस स्टेशन येथे मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
वेल्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारू दशरथ चव्हाण (वय १५ वर्षे रा. कोंडावळे, ता. वेल्हे) ही मुलगी तिचे वडील दशरथ चव्हाण यांना वेल्हे येथे जाते असे सांगून घरातून गेली असून ती अजून पर्यंत घरी न परतल्यामुळे तिला कोणीतरी अज्ञात इसमानी फूस लावून पळवून नेल्या बाबत लक्ष्मण दशरथ चव्हाण (वय ३५ वर्षे, रा. कोंडावळे, ता. वेल्हे) यांनी वेल्हे पोलीस स्टेशन येथे गुरुवारी(दि. १५ फेब्रुवारी) रोजी सायंकाळी फिर्याद दिली आहे.
सदर मुलीचे वर्णन पुढीलप्रमाणे
उंची ५ फुट, रंग सावळा, बांधा मध्यम, घरातून बाहेर पडताना अंगावर पांढऱ्या रांगाची लेगिंस आणि राखाडी रंगाचा टॉप, तसेच पायात हिरव्या रंगाचा सॅंडल.
वरील वर्णनाची मुलगी कोणाला दिसल्यास वा आढळून आल्यास वेल्हे पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस उपनिरिक्षक कदम यांनी केले आहे.