मकर संक्रांतीला तिळगुळ का वाटले जातात? मकरसंक्रांतीलाच पतंग का उडवला जातो? त्यामागे काय आहेत रंजक गोष्टी? वाचा सविस्तर

निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : मकर संक्रांत या सणाचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणत सर्वांना तिळगुळ वाटून मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. नवीन वर्षातला पहिला सण असल्यामुळे अगदी उत्साहत साजरा केला जातो.

आरोग्यासाठी लाभदायी असते तिळ आणि गुळ
आपण मकार संक्रातीला तिळगुळ घ्या आणि गोड बोला असे सांगून तिळगुळ एकमेकांना देतो. तीळ हा खरंतर उष्ण मानला जाणारा पदार्थ आहे. संक्रांतीच्या काळात हवेतील गारवा खूप जास्त वाढतो त्यामुळे या काळात तिळाच्या सेवनाला महत्व दिले जाते. तीळ आणि गुळाचे एकत्र सेवन केल्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते आणि थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहाण्यास मदत होते.

मकरसंक्रातीला का तीळगुळ वाटण्याबाबत धार्मिक कथा
एकदा शनिदेवांवर त्यांचे वडील चांगलेच संतापले होते. त्यांना शांत करण्यासाठी शनिदेवांनी सर्व उपाय करुनही त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेर शनिदेवांने तिळाची पूजा करतात तेव्हा सूर्यनारायण त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि वरदान देतात की, जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन तेव्हा माझी तिळाने पूजा करणाऱ्यांचे सर्व दोष नाहीसे होतील. त्यामुळे तिळाला धार्मिक महत्व प्राप्त झाले. त्यामुळे सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्यांची तिळाने पूजा केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य, शनि आणि बृहस्पति ग्रहांना फुले खाणे आणि दान करणे शुभ ठरते. तिळगुळाच्या प्रसादामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात आणि सर्वत्र शांतता पसरते, याशिवाय शनि महाराजांच्या अशांततेचा शाप नष्ट होतो असे मानले जाते.

मकर संक्रात का साजरा केली जाते
जेव्हा सुर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिष शास्त्रात संक्रांत म्हटले जाते. मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सुर्य मकर राशीत प्रवेश करतो. एका संक्रांतीपासून दुसऱ्या संक्रांतीपर्यंतचा कालावधीला सौर मास असे संबोधले जाते. पौष महिन्यात सूर्य उत्तरायणातून मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे उत्सव म्हणून साजरी केली जाते. संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते, असे मानले जाते. यामागचे मुख्य कारण म्हणजे या दिवसात सूर्य दक्षिण गोलार्ध ते उत्तर गोलार्धात असा फिरत असतो. देवतांच्या दिवसांची सुरुवात होते अशी मान्यता आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दार उघडते. त्यामुळेच या दिवशी केलेले दान-पुण्य अधिक फलदायी असते असे मानले जाते. 

Advertisement

मकर संक्रांतीचे सामाजिक व वैज्ञानिक कारण
वैज्ञानिक कारणाबाबत बोलायचे झाल्यास मकर संक्रांतीला म्हणजे सूर्य उत्तरायणात गेलेल्यांना प्रकृतीमध्ये बदलांना सुरुवात होते. थंडीने गारठलेल्या सूर्याच्या उत्तरायणामुळे थंडीपासून बचाव करण्यास मदत होते. भारत हा कृषिप्रधान देश आहे. येथील सण-उत्सवाचे पर्व हे शेतीवर अवलंबून आहे. जेव्हा शेतकरी रब्बी हंगामाची पेरणीनंतर खरीप हंगामाचे पीक मका, ऊस, शेंगदाणे, उडीद शेतात घेतो, त्याच काळात मकरसंक्रात येतो. शेतकऱ्यांचे घर अन्नधान्याने भरून जाते. म्हणूनच खरीप हंगामातील पदार्थांनी मकर संक्रांतीचे स्वागत केले जाते.

पतंग मकरसंक्रांतीलाच का उडवला जातो?
खर तर मकरसंक्रांत ही हिवाळ्यात येते. तेव्हा आपल्या शरीराला ऊनही फार कमी मिळते आणि आपसूकच थंडीमुळे स्थूलपणा जाणवतो. थंडी अनेक त्वचारोगांना आमंत्रण देते. याकाळात त्वचा कोरडी पडते. म्हणूनच शरिराची हालचाल व्हावी यासाठी हा खेळ खेळला जातो. विशेष म्हणजे मकर संक्रांतीत सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पतंग उडवायच्या निमित्ताने का होईना थंडीतून लोक घराबाहेर पडतात. घराच्या गच्चीवर मोकळया पटागंणात येऊन पतंग उडवण्याचा आनंद लुटतात. त्यामुळे पुरेपुर ऊन शरीराला मिळते. पतंग उडवताना शरीराचा व्यायामही घडतो. आकाशात उडणा-या पतंगाकडे पाहिल्याने दृष्टी सुधारते, तसंच किंचित डोकं मागे घेऊन तोंड उघडं ठेवून पतंग उडवताना नको असलेली ऊर्जा शरीराबाहेर फेकली जाते असेही जाणकारांचे म्हणणे आहे.

पतंगाला आकाशात बघून आपल्याला बराच सकारात्मक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. उंच आकाशात भरारी घेण्याची इच्छा मनात ठेवणे, संतुलित व्यक्तिमत्व, कितीही हवा अली तरी आपले संतुलन ढळू न देणे, आयुष्य जगताना पराभव स्वीकारण्याची तयारी ठेवणे, मोकळ्या आकाशात मोकळा श्वास घेणे, आनंद घेणे आणि आनंद देणे, या व अशा गोष्टींचा यात समावेश होतो.

https://www.facebook.com/m.tv.marathi.2023/videos/1307108363286226/?mibextid=Nif5oz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page