भोर-वेल्हे तालुक्यातील भव्य शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याबाबत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद; मेळाव्यास शरद पवार व संजय राऊतही राहणार उपस्थित
नसरापूर : भोर व वेल्हे तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जाहीर मेळावा शनिवार(दि. ९ मार्च) रोजी दुपारी ४ वाजता पुणे-सातारा महामार्गालगत हरिश्चंद्री(ता.भोर) येथील प्रांगणात होणार आहे. याबाबत हॉटेल चिंतामणी(केळवडे, ता.भोर) येथे महाविकास आघाडीच्या वतीने आज गुरुवारी(दि. ७ मार्च) रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद आयोजीत केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटीनंतर प्रथमच भोर तालुक्यात शरद पवार यांची जाहीर सभा होत आहे. भोर व वेल्हे तालुक्यातील शेतकरी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांना राज्यातील महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असल्याचे यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले. यामध्ये देशाचे माजी कृषि मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार, उ.बा.ठा शिवसेना पक्षाचे खासदार व प्रवक्ते संजय राउत, काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे व भोर-वेल्हे-मुळशी तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे तसेच उ.बा.ठा. शिवसेना जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांचे अनमोल मार्गदर्शन होणार आहे.
भोर-वेल्हे तालुक्यातील जनतेच्या मनात या सभेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. तरी भोर व वेल्हे तालुक्यातील नागरीक, शेतकरी, पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकत्यांनी सदर सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन महाविकास आघाडी भोर-वेल्हा-मुळशी लोकसभा समन्वयक अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी केले.
सदर पत्रकार परिषदेसाठी महाविकास आघाडीचे शैलेश सोनवणे, ज्ञानेश्वर शिंदे, रविंद्र बांदल, प्रतापराव शिळीमकर, नाना राऊत, दीपक दामगुडे, संतोष रेणुसे, पोपटराव सुके, लाहुनाना शेलार, बाबा धुमाळ, यांच्यासह भोर वेल्हे तालुक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.