इलेक्ट्रिक दुचाकीवरून जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू तर दोघे जखमी; फलटण तालुक्यातील घटना
फलटण : दुचाकीवरून जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांवर अचानक वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना आज शनिवारी(दि. ११ मे) फलटण तालुक्यातील सरडे येथे घडली आहे. हे तिघे जन ज्या दुचाकीवर होते, ती दुचाकी इलेक्ट्रिक होती. या घटनेमध्ये दुचाकीवर असणारे इतर दोघे जखमी झाले आहेत.
ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले(वय १७ वर्ष, रा वंजारवाडी खर्डा ता. जामखेड जि. अहमदनगर) असे मृत झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. या घटनेत प्रथमेश सुनील भिसे(वय १७ वर्ष, रा. वायसेवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर) आणि विक्रम विजय धायगुडे(वय १६ वर्ष, रा. सरडे ता. फलटण) हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर बारामती मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरील तीनही विद्यार्थी शारदानगर येथे आयटीआयचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव यांनी दिली.