१ मे ला कामगार दिन व महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?
निनाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्र हे राज्य शूर वीरांचे, संताचे, गडकिल्ल्यांचे आणि कवी-लेखकांनी समृद्ध अशा इतिहासाने रमलेले आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमही साजरे केले जातात.
१ मे या दिवशी महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो. याचे महत्त्व काय? यामागचे कारण काय? जाणून घेऊया.
१ मे ला महाराष्ट्र दिनासोबतच गुजरात दिनही साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन भारतीय राज्यांची स्थापना झाली होती. भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा ही दोन्ही राज्ये बॉम्बे प्रदेशाचा भाग होती. या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती. मराठी आणि गुजराती भाषिकांनी स्वतंत्र राज्याची मागणी केली होती. यावेळी आंदोलनही करण्यात आले होते. १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत अनेक राज्य निर्माण झाली. या कायद्यामध्ये कन्नड भाषिक लोकांसाठी कर्नाटक राज्याची निर्मिती, तर तेलुगू भाषिकांना आंध्र प्रदेश मिळाला. केरळ आणि तामिळनाडू या राज्यांना मल्याळम आणि तामिळ भाषिकांसाठी निवडण्यात आले. परंतु, मराठी आणि गुजरातींसाठी स्वतंत्र असे राज्य नव्हते त्यामुळे आंदोलने करण्यात आली.
१ मे १९६० साली भारताचे तत्कालीन नेहरु सरकारने बॉम्बे पुनर्रचना कायदा १९६० अंतर्गत बॉम्बे प्रदेशचे महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यात विभाजन केले. बॉम्बे बाबतही यात अनेक वाद होते. मराठी भाषिकांना असे वाटायचे की, बॉम्बे त्यांना मिळायला हवे तर गुजराती लोकांना असे वाटते की, मुंबई ही त्यांच्यामुळेच आहे. कालांतराने मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली.
भारतात कामगार दिन केव्हापासून साजरा करण्यास सुरुवात झाली?
अमेरिकेत कामगार दिन साजरा करण्याचा प्रस्ताव १ मे १८८९ रोजी अंमलात आला, परंतु भारतात हा दिवस ३४ वर्षांनंतर साजरा करण्यास सुरुवात झाली. भारतातही कामगार अत्याचार आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवत होते. कार्यकर्त्यांचे नेतृत्व डाव्यांकडून केले जात होते. त्यांच्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर १ मे १९२३ रोजी चेन्नईत प्रथमच कामगार दिन साजरा करण्यात आला. श्रमिक किसान पार्टी ऑफ हिंदुस्थानच्या अध्यक्षतेखाली कामगार दिन साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. अनेक संघटना आणि सामाजिक पक्षांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.