तांभाड येथील कुस्तीपट्टु विशाल शिळीमकर याची आशियाई स्पर्धेसाठी निवड
नसरापूर : तांभाड(ता.भोर) येथील कुस्तीपट्टु विशाल हरिश्चंद्र शिळीमकर याची जाँर्डन ओमान येथे २२ ते ३० जुन दरम्यान होणारया आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत १७ वर्षाखालील कुमार आशियाई स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्याच्या या निवडी बद्दल भोर तालुक्यातील कुस्तीक्षेत्रातुन अभिनंदन होत आहे.
विशाल शिळीमकर हा तांभाड येथील कै.ना.काशिनाथराव खुटवड कुस्ती संकुलात वस्ताद मनोज शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवत आहे. आशियाई कुस्ती स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी भारतीय कुस्ती महासंघाची निवड चाचणी दिल्ली येथे पार पडली या निवड चाचणीत महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाकडुन विशाल शिळीमकर यांनी ४८ वजनी गटात अतिशय नेत्रदिपक कुस्ती करत प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवत कुमार आशियाई स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला.
विशाल शिळीमकर याची खेळण्याची पध्दत व कौशल्य ओळखुन पुणे येथील जाणता राजा कुस्ती केंद्राचे वस्ताद पैलवान संदीप भोंडवे यांनी जाणता राजा कुस्ती केंद्राच्या वतीने सुरु केलेल्या मिशन आँलिंम्पिंक साठी दत्तक कुस्तीगिरा मध्ये विशाल याची निवड केली आहे. तीन वर्षा पासुन सुरु केलेल्या या आँलिंम्पिंक मिशन अंतर्गत वस्ताद भोंडवे यांनी दहा कुस्तीगीर दत्तक घेतले असुन या कुस्तीगीरांचा निवास,भोजन व खुराकाचा खर्च जाणता राजाच्या वतीने केला जातो आहे. या निवड केलेल्या कुस्तीगीरा मधुन विशाल शिळीमकर यांच्या बरोबर ५१ किलो मध्ये पैलवान रोहन भडांगे, ६५ किलो मध्ये पैलवान ओमकार काटकर यांची अशियाई कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विशाल चे वस्ताद मनोज शिळीमकर यांनी बोलताना सांगितले कि, विशाल याचा आत्मविश्वास मोठा आहे. जेवढी मोठी स्पर्धा तेवढी त्याची जिद्द वाढते, मिडवेट ग्रिफ मध्ये ऩँशनलच्या खेळाडु मध्ये त्याची खासियत असुन त्याचा हात कोण धरु शकत नाही. आशियाई मध्ये पहिल्या तीन मध्ये तो विजेता होणारच याची मला खात्री आहे.