भाटघर धरणात ८२.५३ टक्के तर नीरा देवघर धरणात ८३.७३ टक्के पाणी साठा
भोर : भोर तालुक्यातील नीरा देवघर व भाटघर घरणातून सध्या आवर्तन सोडले असल्याने दोन्ही धरणातील पाणी साठा कमी झाला आहे. नीरा देवघर धरणात ८३.७३ टक्के तर भाटघर धरणात ८२.५३ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे.
नीरा देवघर धरणाच्या पॉवर हाऊसमधून ७५० क्यूसेक तर भाटघर धरणाच्या पॉवर हाऊसमधून १७२४ क्यूसेक पाण्याचे आवर्तन सुरू आहे. मागील आठवड्यात नीरा देवघर धरणात ८७.२० टक्के तर भाटघर धरणात ८७.२० टक्के पाणी साठा होता.
नीरा देवघर धरण यंदा १९ ऑगस्ट रोजी १०० टक्के भरले होते तर गत वर्षी १३ ऑगस्ट रोजी भरले होते. याच बरोबर २३.७४ टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता असलेले भाटघर धरण बुधवारी (दि.२० सप्टेंबर) १०० टक्के भरले होते. तर गेल्यावर्षी धरण १२ ऑगस्ट रोजी भरले होते. एकंदरीत भाटघर धरण गेल्या वर्षीच्या तुलनेत सव्वा महिन्यांनी उशिरा भरले होते. आता दोन्ही धरणात असलेला ८३ व ८२ टक्के पाणी साठ्याचा पुढील सहा महिन्यांसाठी वापर होणार आहे.