भोर तालुक्यातील जोगवडी येथून जेसीबी ची चोरी
नसरापूर : भोर तालुक्यातील जोगवडी येथून चक्क जेसीबी चोरी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अनिल शिवाजी बोडके(वय ३० वर्षे,रा. म्हाळवडी, ता. भोर) यांनी याबाबत राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जोगवडी(ता.भोर) गावातील काळुबाई मंदीरासमोर शनिवारी सायंकाळी जेसीबी चालक शाहीजात गुलाब स्सुल अन्सारी यांनी जेसीबी(एम.एच.१२ जे.के.११६५) पार्क केला. दुसऱ्या दिवशी चालक कामानिमित्त जेसीबी बाहेर काढण्यासाठी पार्क केलेल्या जागी गेला असता तिथे त्यास जेसीबी आढळून आला नाही. चालकाने लगेच ही गोष्ट जेसीबी मालक व फिर्यादी अनिल बोडके यांस सांगितली. त्यांनी लगेचच राजगड पोलीस ठाण्यात धाव घेत या घटनेची माहिती राजगड पोलिसांना दिली. दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील घटनेचा तपास राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार नाना मदने करीत आहेत. तसेच पिवळ्या रंगाचा वरील क्रमांकाचा जेसीबी कोणांस आढळून आल्यास राजगड पोलीसांशी संपर्क करण्याचे आवाहन त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.