पुरंदरमधील गराडे धरण १०० टक्के भरले; सरपंचांनी केले पाण्याचे पूजन

सासवड : पुरंदर तालुक्याचे शहर असलेल्या सासवडसह पाच गावांना पाणीपुरवठा करणारे गराडे धरण आज बुधवारी(दि. २४ जुलै) शंभर टक्के भरले. धरणाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सुरु झाला आहे. मागील चार-पाच दिवसापासून पुरंदरच्या पश्चिम भागात म्हणजेच पुरंदर किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये संततधार पाऊस पडत आहे.

Advertisement

त्यामुळे गराडे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून पाणी नदी पात्रात जाऊ लागले आहे. पुरंदरच्या पश्चिम भागातील जनतेला यामुळे दिलासा मिळाला आहे. कऱ्हा नदी वाहू लागल्याने या नदीमधून पाणी आता नाझरे धरणात येणार आहे. मागील सहा ते सात महिन्यापासून नाझरे धरण कोरडे असून नाझरे धरणात पाणी आले तर पुरंदरसह बारामतीतील ७२ वाड्यावस्ती आणि गावांचा पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. दरम्यान, गराडे धरण पूर्णपणे भरल्यानंतर भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे आणि गराडेचे सरपंच नवनाथ गायकवाड, यांनी या पाण्याचे पूजन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page