कृषी ग्रामीण विकास समितीच्या को-चेअरमन पदी बाळासाहेब सोळांकुरे पाटील यांची नियुक्ती
पुणे : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योग आणि कृषी, मुंबई यांच्या कृषी ग्रामीण विकास समितीच्या को-चेअरमन पदी बाळासाहेब सोळांकुरे पाटील(रा. कासुर्डी खे. बा., ता. भोर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योग आणि कृषी, हे १९२७ पासून महाराष्ट्र राज्यातील सर्व उद्योजकांचे व्यापारी वर्गाला शासकीय स्तरावरील व स्थानिक स्तरांवरील अडचणी सोडविण्यासाठी व व्यापार वाढीसाठी प्रामुख्याने कार्यरत असते, तसेच देश विदेशातील आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतीमालाची विक्री वाढवण्यासाठी विदेशातील एक्जीबिशन, सहभागी करून B2B, भारतीय राजदूतच्या माध्यमातून विदेशात एक्सपोर्ट वाढण्यासाठी सदैव प्रयत्नशील असते.
या प्रसंगी नियुक्ती झाल्यानंतर बाळासाहेब सोळांकुरे पाटील म्हणाले की, “अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र मांणगावे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष दिलीप गुप्ता, कोकण उपाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांच्या माध्यमातून माझी नियुक्ती झालेल्या पदाचा महाराष्ट्र राज्यातील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी संचालक, महिला बचत, फुड प्रोसेसिंग कंपनी संचालक, ॲग्रो बिजनेस उद्योजक यांना महाराष्ट्र चेंबर कॉमर्सच्या माध्यमातून देश तसेच विदेशात शेतमाल विक्री व्यवस्था करून आर्थिक सक्षम करण्यासाठी व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स मुंबई मेंबरशिप मध्ये समाविष्ट करून एक संघटनात्मक संरचना समुहाने एकत्रित येऊन महाराष्ट्र राज्यातील व्यापार वाढीसाठी सदैव प्रयत्नशील राहणार” असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.