फिटनेस उद्योगात यशस्वीरित्या १४ वर्ष पूर्ण केल्याबद्दल कोंढणपूर फाटा येथील ‘महाबली जिम’ने केला वर्धापनदिन साजरा
खेडशिवापूर : कोंढणपूर फाटा(ता.हवेली) येथील ‘महाबली जिम’च्या वतीने चौदावा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. ज्यामध्ये त्यांच्या सर्व सदस्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महाबली जिम हे फिटनेस उद्योगातील विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जाते.
१ ऑगस्ट २००९ रोजी या जिमची स्थापना करण्यात आली. या जिममध्ये २०० हून अधिक सदस्यांचा सदस्यत्व असण्याचा मान आहे. जिममध्ये मागील २ वर्षात आधुनिक सामग्री मध्ये वाढ केली असून त्यामध्ये प्रामुख्याने ट्रेड मिल, सायकल, क्रॉस फिट, वेट ट्रेनिंग, कार्डिओ ट्रेनिंग, स्टीम बाथ यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमा निमित्त तरुण पिढीला उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी प्रोत्साहित करण्यासाठी महाबली जिमचे व्यवस्थापक विजय शिंदे व देव शर्मा यांच्यावतीने केक कापण्यात आला. अतुलनीय सेवा आणि मूल्ये देऊन भविष्यातील निरोगी पाया तयार करण्यात आणि टिकून राहण्यासाठी महाबली जिमने यशस्वीरित्या यश मिळवले आहे.
या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी महाबली जिमचे ट्रेनर तुषार गवळी, अतीश कांबळे, विवेक सुर्वे, मुस्ताक कुरजगी, हर्षद कोंडे, अमोल डिंबळे, मंगेश शिंदे, मंथन वाडकर, विनायक मोहिते, रोहित धोंडे, अमर शिखरे, सौरभ मोरे, प्रतीक थिटे गणेश तांबे तसेच महाबली जिमचे बरेचसे सदस्य उपस्थित होते.