राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये अनंत निर्मल ग्लोबल स्कूल धांगवडी प्रथम
कापूरहोळ : राजगड ज्ञानपीठाच्या अनंत निर्मल ग्लोबल स्कूल धांगवडी(ता.भोर जि.पुणे) येथील विद्यार्थ्यांनी निगडी येथील मीनाताई ठाकरे स्पोर्ट्स कॅम्पस येथे आयोजित दुसऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून आपले यश संपादन करून १३ सुवर्ण पदक , १८ रौप्य पदक आणि १६ कांस्य पदक पटकावले.
सर्व विजेत्यांना राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव थोपटे , कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, मानद सचिव स्वरूपा थोपटे यांनी विशेष कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन कॅम्पसचे इस्टेट मॅनेजर राहुल खामकर व प्राचार्या सबिहा शेख यांनी केले. तसेच क्रीडा प्रशिक्षक किरण साळेकर व इतर स्टाफने विद्यार्थ्यांचा सराव करून घेतला.
विजेते विद्यार्थी खालील प्रमाणे
सुवर्णपदक विद्यार्थी – सई साळेकर, नेहा बोबडे, लविष शेख , प्रतीक्षा राजपुरोहित, श्लोक भालघरे, शर्मिष्ठा कुलकर्णी, अर्णव खंडाळे, कृष्णल शेटे, ईश्वरी शेटे, आरव पाटील, श्रीनील जाधव, जिविका टापरे, मितांश गडाख.
रौप्य पदक विद्यार्थी – आरीष कुलकर्णी, स्वर्णिका जाधव, तनिष तनपुरे, राजवीर गाडे, समृद्धी देवकाते, श्रेया शेटे, दर्शन खुटवड, रोहित संघशेट्टी, स्वरा महांगरे, शिवम निगडे, ओम डिंबळे, श्रुती खिलारे, समर्थ रांजणे, समर्थ मैंद , श्लोक कस्तुरे, रणवीर शिंदे, श्रीराज रोमण, स्वरा कोख.
कांस्यपदक विद्यार्थी – वेदांतिका खामकर, शिवश्री शेटे, इरा कुंभार, सर्वज्ञ डिंबळे, शिवम टापरे, तनिषा धाकड, तन्मय बोबडे, आदित्य दिवाकर, अंकित तळेकर, प्रणव बाटे, अनिरुद्ध लोखंडे, अथर्व खंडाळे, आरोही खंडाळे, कृष्णा डिंबळे , अन्वेषा खाटपे, वैदही इंगळे.