पुणे-सातारा महामार्गावर सारोळे गावचे हद्दीत झालेल्या अपघातात एक तरुण गंभीर जखमी
सारोळे : पुणे-सातारा महामार्गावर सारोळे(ता.भोर) गावच्या हद्दीत ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी(दि. २० जून) सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. शंकर बाप्पुसो निकम(वय २४ वर्ष, रा. विद्यानगर, सांगली) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा महामार्गावर पुण्याच्या दिशेने दुचाकी(एम. एच. १० डी. ई. १४५४) वरून जात असनाऱ्या तरुणाला मागून येणाऱ्या ट्रकने(के. ए. २५ ए. बी. ६०८४) सारोळे गावच्या हद्दीत धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार शंकर निकम हा तरुण गंभीर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच राजगड पोलिस ठाण्याचे पोलीस अंमलदार नाना मदने व मयूर निंबाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत जगद्गुरु नरेंद्र महाराज अँब्युलन्सचे चालक तुळशीराम अहिरे यांच्या सहकार्याने जखमी तरुणास खासगी रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ दाखल केले. तसेच महामार्गावर अपघातामुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस करीत आहेत.