कापूरहोळ येथे बिबट्याकडून वासराचा फडशा; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कापूरहोळ : कापूरहोळ गावच्या हद्दीतील साळोबाची वाडी येथील शेतकरी किरण गायसमुद्रे यांच्या शेतात बांधलेल्या दोन वासरांवर बिबट्याने हल्ला केल्याने त्यातील एक वासरू जागीच ठार झाले असून एक जमखी झाल्याची घटना रविवारी(दि. ११ ऑगस्ट) रात्री घडली. या परिसरामध्ये बिबट्याच्या या हल्ल्यामुळे गरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या हल्ल्यामुळे गायसमुद्रे या शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले असून वनविभाने बिबट्याचा बंदोबस्त करून, नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी वनविभागाकडे केली आहे. या घटनेची माहिती शेतकरी किरण गायसमुद्रे यांनी आज सोमवारी(दि. १२ ऑगस्ट) सकाळी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वणविभागाच्या वतीने वनरक्षक अवधूत गुजर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटने नंतर परिसरातील नागरिकांना वनविभागाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.