भोर – महाविकास आघाडीचे सरकार येऊन आ. संग्राम थोपटेंना मंत्रीपद मिळावे; यासाठी निगडेतील ग्रामस्थांचे साकडे, ग्रामदैवताला घातला अभिषेक
भोर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोर तालुक्यात महाविकास आघाडी, महायुती तसेच अपक्ष उमेदवार यांचे जोरदार गावभेट व प्रचार दौरे सुरू आहेत. सध्यातरी या निवडणुकीत विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांचे पारडे जड असून त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेकजण काँग्रेस पक्षात मोठ्या प्रमाणावर प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामध्ये निगडे(ता. भोर) येथील ग्रामपंचायत सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी देखील काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश केला होता.
यादरम्यान आज शुक्रवारी(दि. १ नोव्हेंबर) सकाळी साडेसात वाजता निगडे गावातील ग्रामस्थांनी आ. संग्राम थोपटे हे मोठ्या मताधिक्याने विजयी व्हावेत. तसेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन त्यांना मंत्रीपद मिळावे, यासाठी गावाचे ग्रामदैवत महाकाली माता व नवसाला पावणारा उजव्या सोंडेचा श्री महागणपती यांना साकडे घालत अभिषेक केला. याचे संपूर्ण आयोजन संदीप चिकणे (ग्रामपंचायत सदस्य), मच्छिंद्र कुंभार (ग्रामपंचायत सदस्य), राजेंद्र जाधव, व विपुल बारणे यांनी केले होते.
याप्रसंगी पोपटराव सुके, शंकर मालुसरे, अरुण मालुसरे, अनिल सुके, गणेश सुके, आप्पाजी जाधव, महादेव जाधव, मारुती चिकने, रामचंद्र पोळ, जगन्नाथ मालुसरे, राजाराम बारणे, बाबुराव जाधव, रमेश मालुसरे, श्रीकांत सुके, हृषीकेश मालुसरे, अमर मालुसरे, शरद मालुसरे, एकनाथ मालुसरे, तानाजी मालुसरे, दामोदर चिकने व गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.