BIG BREAKING : भोर विधानसभेसाठी अखेर ६ उमेदवार रिंगणात; ९ जणांची माघार, कोण आहेत अंतिम उमेदवार? काय आहेत त्यांचे निवडणूक चिन्ह?सविस्तर वाचा

BIG BREAKING : भोर विधानसभेसाठी अखेर ६ उमेदवार रिंगणात; ९ जणांची माघार, कोण आहेत अंतिम उमेदवार? काय आहेत त्यांचे निवडणूक चिन्ह?सविस्तर वाचा

 

भोर : भोर विधानसभा मतदार संघासाठी भोर-राजगड-मुळशी तालुक्यातील २३ उमेदवारांनी अर्ज भरले होते. त्यातील ८ उमेदवारांचे अर्ज हे छाननीत बाद करण्यात आले होते. त्यांनतर १५ उमेदवार हे वैद्य ठरले होते. उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांसाठी आज सोमवार (दि. ४ नोव्हेंबर) हा निवडणुकीतून माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता. 

यादरम्यान ९ उमेदवारांनी माघार घेतली असून अंतिम ६ उमेदवार भोर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामधील उमेदवाराचे नाव, पक्ष व चिन्ह खालील प्रमाणे 

     नाव       –     पक्ष        –       चिन्ह

Advertisement

१) संग्राम थोपटे – काँग्रेस – हाताचा पंजा

२) शंकर मांडेकर- राष्ट्रवादी काँग्रेस – घड्याळ 

३) अनिल जगताप – सैनिक समाज पार्टी – जहाज

४) लक्ष्मण कुंभार – दलित शोषित पिछडावर्ग अधिकार दल – हार्मोनियम

५) कुलदीप कोंडे – अपक्ष – रिक्षा 

६) किरण दगडे  – अपक्ष – चहाची किटली

तसेच माघार घेतलेल्या ९ उमेदवारांमध्ये पियुषा किरण दगडे(ता.मुळशी), प्रमोद पंडित बलकवडे(ता.मुळशी), बाळासाहेब रामदास चांदेरे(ता.मुळशी), भाऊ पांडुरंग मरगळे(ता.मुळशी), राहुल चांगदेव पवार(ता.भोर), सचिन सदाशिव देशमुख(ता.भोर), समीर विठ्ठल पायगुडे(ता.मुळशी), सूर्यकांत राजाराम माने(ता.भोर), संजय भाऊसाहेब भेलके(ता.भोर) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page