शिरूर मधील मिडगुलवाडीत तब्बल १७४ किलो ड्रग्ससाठा जप्त…
शिरूर प्रतिनिधी : विकास गायकवाड
शिरूर : नार्कोटिक्स विभागाच्या पथकाने मिडगुलवाडी (ता.शिरूर) येथील एका कंपनीवर छापा टाकला. या कंपनीच्या शेड मधे फरशी पुसण्याचे केमिकल बनवले जात असल्याची माहिती जवळपास च्या लोकांना होती. कंपनी शहरा पासून दूरवर असल्याने यामधे ड्रग्स बनवले जात असतील याची पुसटशी कल्पना देखील कोणाला नव्हती. मिडगुलवाडी नजिक अनेक ठिकाणी व्यावयिकांनी जागा खरेदी करत मोठमोठे शेड मारले आहेत. या घटनेशी कुप्रसिद्ध ड्रग्स तस्कर ललित पाटील चा काही संबंध आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. या कंपनी बाबत ची गोपनीय माहिती नार्कोटिक्स विभागाला मिळाल्यावर. नर्कोटिक्स विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. ही कारवाई गोपनीय रित्या करण्यात आली. ही कारवाई खूप तास चालू होती.नार्कोटिक्स पथकाने ही कंपनी सिल केली आहे. या कंपनीत फिनेल तयार करत असल्याचे भासवून चक्क अल्प्राझोलम ड्रग्स बनवले जात असल्याचे समजले. ड्रग्स व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून कंपनी गेट ला सिल करण्यात आले. या कारवाईत केमिकल ओतून काही साहित्य जाळून नष्ट करण्यात आले.शेडच्या परिसरात उग्र वास येत असून या कारवाई मुळे शिरूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.