पसुरेतील वाढेश्वर मंदिरात ५५१ किलो द्राक्षांची आरास
भोर : वेळवंड खोऱ्यातील पसुरे (ता.भोर) येथील ग्रामदैवत श्री वाढेश्वर मंदिरातील गाभारा व सभामंडपाला ५५१ किलो हिरव्या द्राक्षांची भव्य आरास करून घाबाऱ्याची सजावट करण्यात आली. श्री वाढेश्वर मंदिराच्या ६ वर्धापनदिनाच्या निमित्याने ग्रामस्थ विशाल धुमाळ यांचे सहकार्याने द्राक्षांची सुंदर आणि मनमोहक सजावट करण्यात आल्याचे मानसिंग बाबा धुमाळ यांनी सांगितले.
ग्रामदैवत वाढेश्वर मंदिराचा ६ वा वर्धापनदिन नुकताच साजरा करण्यात आला. रामनवमी ते हनुमान जयंती दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भजन, कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर वर्धापन दिनाचे औचित्याने केलेली द्राक्ष सजावट पाहण्यासाठी परिसरातील भाविकांसह नागरिकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले. द्राक्ष सजावट करण्यासाठी सहकार्य केल्याने ग्रामस्थांनी विशाल धुमाळ यांचे आभार मानले.