भोर तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडतीची तारीख ठरली; “या” ठिकाणी होणार सोडत
भोर : आगामी काळात होऊ घातलेल्या भोर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदाच्या सोडती संदर्भात भोरचे तहसीलदार राजेंद्र नजन यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार भोर तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असून यासंदर्भात सरपंच पदाची आरक्षण सोडत जाहीर करण्यासाठी २३ एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
भोर-महाड मार्गावरील अभिजित मंगल कार्यालय येथे दुपारी १२ वाजता आरक्षण सोडत म्हणजेच ड्रॉ घेतला जाणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची मानली जात असून, विविध सामाजिक घटकांना संधी मिळवून देण्यासाठी सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. या सरपंच पदाच्या आरक्षण सोडती करिता नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन भोर तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेले आहे.