भोर तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांची आरक्षण सोडत पुन्हा जाहीर; कोणत्या गावात कुठलं आरक्षण?
भोर : तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षणांची बहुप्रतिक्षित सोडत अखेर पुन्हा एकदा सोमवारी (दि. ७ जुलै) अभिजीत मंगल कार्यालय, भोर-महाड रोड येथे पार पडली. एकूण १५६ ग्रामपंचायतींपैकी ७९ ग्रामपंचायती सरपंचपदी महिलांसाठी आरक्षित झाल्याने तालुक्यात ‘महिलाराज’ येणार आहे. यापूर्वी दि. २३ एप्रिल रोजी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण सोडती करून निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले होते.
मात्र नव्या शासन निर्णयानुसार त्यावेळच्या आरक्षणांना रद्द करीत पुन्हा एकदा तालुक्यातील १५६ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदांचे आरक्षण सोडत करण्यात आले. या सोडतीमध्ये थोडासा बदल झाला असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी ९९ ग्रामपंचायती, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ४२, अनुसूचित जातींसाठी १० आणि अनुसूचित जमातींसाठी ५ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत.
पुन्हा एकदा राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये महिलांसाठी आरक्षण ठरल्याने काहींच्या आकांक्षांना फटका बसला आहे. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, नायब तहसीलदार अरुण कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमास राजकीय पक्षांचे स्थानिक प्रतिनिधीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गत आरक्षण रद्द करत नव्याने संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली.
गावनिहाय पडलेले आरक्षण खालील प्रमाणे
अनुसूचित जातीचे आरक्षण
(अनुसूचित जाती स्त्री) सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती (एकूण ५) – पसुरे, आपटी, नाटंबी, सारोळे, म्हसर बु.
(अनुसूचित जाती) सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती (एकूण ५) – आंबेघर, नसरापूर, आंबावडे, कापूरव्होळ, करंदी बु..
अनुसूचित जमातीचे आरक्षण
(अनुसूचित जमाती, स्त्री) सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती (एकूण ३) – तांभाड, करंदी खे.बा., येवली.
(अनुसूचित जमाती) सरपंच पदासाठी आरक्षित ग्रामपंचायती (एकूण २) – वागजवाडी, माळेगाव
नागरिकांचा मागास प्रवर्गचे आरक्षण
(नागरीकांचा मागास प्रवर्ग स्त्री) सरपंच पदासाठी निश्चित केलेल्या ग्रामपंचायती (एकूण २१) – सांगवी हि.मा., शिंद, भुतोंडे, संगमनेर, किकवी, नऱ्हे, राजापूर, माझगाव, शिरवली हिमा, कोंढरी, मोहरी खुर्द, किवत, उत्रौली, वडगाव डाळ, गोरड म्हसवली, धांगवडी, न्हावी १५, वर्वे बु, कासुर्डी गुमा, देगाव, गोकवडी.
(नागरीकाचा मागास प्रवर्ग) सरपंच पदासाठी निश्चित केलेल्या ग्रामपंचायती (एकूण २१) – नेरे, हर्णस, ब्राह्मणघर वे.खो., बसरापूर, राजघर, वारवंड, प-हर खुर्द, बाजारवाडी, कोर्ले, हातनोशी, कुंबळे, सांगवी बु., कासूर्डी खे. बा., वारे खुर्द, कुरुंजी, पेंजळवाडी, महुडे खुर्द, हातवे खुर्द, रावडी, दुर्गाडी, सांगवी वेखो.
(सर्वसाधारण प्रवर्ग) चे आरक्षण
(सर्वसाधारण प्रवर्ग स्त्री) सरपंच पदासाठी निश्चित केलेल्या ग्रामपंचायती (एकूण ५०) – वेळू, भोलावडे, भोंगवली, वर्वे खु., शिंदेवाडी, कारी, चिखलगाव, मोहरी बु., महुडे बु., रांजे, वेनवडी, कांबरे खे.बा., रायरी, ससेवाडी, उंबरे, गवडी, पारवडी, मळे, म्हाळवडी कर्नवडी, इंगवली, पांडे, चिखलावडे, आळंदे, करंजे, हिर्डोशी, पोंम्बर्डी, दापकेघर, सावरदरे, आळंदेवाडी, वाठार हिंगे, टापरेवाडी, धावडी, सांगवी खु., गुणंद, विरवाडी, भाबवडी, पांगारी, शिरवली तर्फे भोर, वाढाणे, खडकी, वरोडी बु., नायगाव, जोगवडी, कोळवडी, शिरगाव, करंजगाव, आशिंपी, खोपी, न्हावी ३२२, म्हसर खुर्द.
(सर्वसाधारण प्रवर्गासाठी) सरपंच पदासाठी निश्चित केलेल्या ग्रामपंचायती (एकूण ४९) – केळवडे, कामथडी, शिवरे, खानापुर, हातवे बु., केंजळ, कुसगाव, वडतुंबी, कर्नावड, आंबाडे, निगडे, कुरुंगवडी, टिटेघर, दिवळे, नांदगाव, नाझरे, कांजळे, जांभळी, मोरवाडी, अंगसुळे, जयतपाड, वाठार हिमा, हरिश्चंद्री, बालवडी, निगुडघर, बारे बु., नांद, पळसोशी, साळवडे, गुहिणी, भांबवडे, शिळींब, डेहेण/ कोंडगाव, पान्हवळ, करंदी खुर्द, वरोडी खु., म्हाकोशी, वरोडी डायमुख, सोनवडी, साळव, सांगवी तर्फे भोर, पिसावरे, भावेखल, गुढे – निवंगण, पाले, वेळवंड, तेलवडी, प-हर बु., कांबरे बु.