पिंपरी चिंचवड मधील पोलीस उपनिरीक्षक DREAM 11 माध्यमातून करोडपती !
जिंकले तब्बल दीड कोटी…
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांनी मंगळवार (दि. १०) रोजी झालेल्या इंग्लंड विरुद्ध बांगलादेश या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हन टीम तयार केली होती. त्यामध्ये त्यांनी तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस जिंकले.
पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे हे गेले काही महिन्यांपासून ड्रीम इलेव्हन वर टीम तयार करत होते. त्यांना क्रिकेट ची खूप आवड आहे.
ड्रीम इलेव्हन च्या माध्यमातून अनेक जण ड्रीम टीम बनवत असतात. आणि त्यामध्ये सध्या वर्ल्ड कप क्रिकेट चालू असल्याने खूप जण त्यावर टीम बनवतात.
ड्रीम इलेव्हन वर दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांचे कुटुंबीय आनंदित झाले आहेत. परिसरात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
ऑनलाईन गेम हा जोखमीच्या आधीन आहे. त्याची सवय लागू शकते. काळजी घ्यावी. असे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे यांचे मत आहे. सध्या वर्ल्ड कप चालू असल्याने सर्व जण ड्रीम टीम बनवत असतात. त्यामधे सायबर क्राईम वाढला आहे. त्यामुळे गेम खेळताना काळजी घ्यावी असे त्यांनी आवाहन केले आहे.