राजगड पोलीसांचा कापूरहोळ येथील मटका अड्ड्यावर छापा…
कापूरहोळ : भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे मटका अड्डा चालू असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून राजगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांना आज मंगळवार (दि.१७) रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मि. च्या दरम्यान कापूरहोळ गावचे हददीत अमृता बार हॉटेल चे शेजारी मोकळया जागेत अक्षय किसन सावंत (वय २६ वर्षे) राहणार,सच्चाई माता मंदीर कात्रज पुणे४६,हा मटका चालवत असल्याचे आढळून आले. राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय हा लोकांकडुन पैसे स्विकारून स्वतःचे आर्थिक फायदया करीता कल्याण नावाचा मटका बेकायदेशिर बिगर परवाना चालवत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडे एकूण रोख रक्कम ८४० रु. व मटका चालविण्यासाठी लागणारे साधन सापडले. म्हणुन राजगड पोलीसांनी त्याच्या विरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंध अधिनियम कलम १२ (अ) अन्वये कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या किकवी चौकीचे पोलिस नाईक गणेश लडकत करीत आहेत.