आश्चर्यजनक! शिरवळ-लोणंद रोड वर एका रात्रीत आले गतिरोधक….कोणत्याही सूचनेचे फलक न लावता गतिरोधक टाकल्या मुळे खूप वाहनांचे अपघात व नुकसान…
खंडाळा : शिरवळ-लोणंद रोड वर भोळी(ता.खंडाळा) हद्दी मध्ये कोणतीही पूर्व सूचना न देता सोमवार (दि.१७) रोजी रात्री रोड प्रशासनाच्या ठेकेदाराने शिरवळ-लोणंद रोड वर अचानक गतिरोधक टाकल्याने प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गतीरोधक असलेले कोणतेही सूचना फलक न लावल्यामुळे हे अपघात झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. रात्री पासून आज मंगळवार (दि.१७) पर्यंत खूप प्रवाशांचे अपघात झाले आहेत. त्यामधे त्यांना दुखापत आणि वाहनांनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रवाशांच्या वाहनांचे झालेले नुकसान भरपाई कोण देणार? असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शिरवळ पोलिसांनी या संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.