भोर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालय किकवी येथे मोर्चा…

भोर : भोर तालुक्यातील पुर्व भागातील सारोळा ते गुनंद पर्यंतच्या शेतकर्यांनी आज मंगळवार (दि.१७) रोजी सकाळी १२ वाजता महावितरण कार्यालय किकवी येथे मोर्चा उपस्थित केला होता.मोर्चा चा प्रमुख विषय हा वारंवार होत असलेला लाइन फॉल्ट, सलग आठ तास लाइट न देणे तसेच मंजूर असूनही सब स्टेशन न होणे असे प्रमुख विषय होते. या संबंधीचे पत्र महावितरण मधील वायरमन कपिल येवले, राहुल निगडे, अभय झारे,अमोल पाटणे, हृषिकेश कारळे यांच्या उपस्थितीत कनिष्ठ अभियंता पठण शेट्टी यांना देण्यात आले. यासंदर्भात त्यांनी अशी माहिती दिली की, किकवी सबस्टेशन ला भाटघर सेक्शन वरून लाईट येते. भाटघर सेक्शन चा खाली ६ गावे येतात आळंदे, आळंदेवाडी, खंडोबाची वाडी,संगमनेर, माळवाडी, इंगवली ही गावे झाल्यानंतर किकवी सबस्टेशन चालू होते.तसेच परिंचे,म्हाऊर सेक्शन आहे.. ही सेक्शन झाल्याशिवाय टापरेवाडी, गुनंद, हिंगेवाठार या गावांना लाईट मिळत नाही. यासाठी नवीन सबस्टेशन होणे गरचेचे आहे.आणि ते मंजूर ही झाले आहे. परंतु जागा न मिळाल्यामुळे ते अजून प्रलंबित आहे त्यामूळे सहकार्य करावे असे कनिष्ठ अभियंता पठण शेट्टी यांनी सांगितले. या वेळी पूर्व भागातील अशोक नाना सोनवणे,राहुल कापरे,नवनाथ सोनवणे, आत्माराम शिळीमकर, भानुदास सोनवणे, भुजंग आडसुळ,धनाजी गायकवाड,रमेश काका सोनवणे, विजय सोनवणे, नितीन सोनवणे,रामभाऊ निगडे,अर्जुन नाना सुर्वे आदी शेतकरी उपस्थित होते. या मोर्चावेळी राजगड पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येणाऱ्या किकवी चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के,पोलीस नाईक नाना मदने, भागीरथ घुले, योगेश राजीवडे यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page