भोर तालुक्यातील किकवी गाव प्लास्टिक मुक्त करण्याचा ग्रामस्थांचा संकल्प…
कापूरहोळ प्रतिनिधी : मंगेश पवार
किकवी : महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आता नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे. किकवी गावा मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवामध्ये सहावी माळ दिवशी किकवी ग्रामपंचायत आणि महिला मंडळ यांनी प्लास्टिक बंदी हा संकल्प केला आहे.यावेळी केळवडे व साळवडे गावचे ग्रामसेवक अभय निकम यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की प्लास्टिक मुळे पर्यावरणाचा होत असलेला निसर्गाचा ऱ्हास,आणि हानी हे घातक आहे.नदी, ओढा प्रदूषण आणि त्यापासून उद्भवणाऱ्या समस्या मुळे ग्रामपंचायत किकवी यांनी प्लास्टिक बंदी करण्याचा संकल्प केला आहे.
कचरा एक मोठी समस्या आहे ती पर्यावरणाला हानी आणि नष्ट करून गावाला विद्रूप करण्याचे काम करते. प्लास्टिक कचरा नष्ट करणे शक्य नसल्याने दिवसेंदिवस प्लास्टिकच्या कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. येणाऱ्या काळामध्ये किकवी गावांमध्ये मोठा घनकचरा प्रकल्प करणार आहे. त्यासाठी प्लास्टिक वर बंदी आणि उत्तम आरोग्याची संधी, प्लास्टिक हटवा पर्यावरण वाचवा असा संकल्प युवा सरपंच नवनाथ कदम यांनी सांगितला.प्लास्टिक बंदी मोहीमेप्रसंगी किकवी गावचे ग्रामसेवक विजय गेजगे, ग्रामसेवक अभय निकम, किकवी ग्रामपंचायतचे युवा सरपंच नवनाथ कदम, सदस्य भास्कर सपकाळ, मौलाउद्दीन शेख, दिपाली काकडे, वंदना अहिरे, तंटामुक्ती उपाध्यक्ष तानाजी भिलारे, गावचे ग्रामस्थ महिला व नवरात्र उत्सव महिला कमिटी आदी उपस्थित होते