वाघजाई माता मंदिर येथे शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा…उत्साहात प्रमुख आकर्षण ठरले भोरमधील आझाद मित्र मंडळ संचालित सातारची सुप्रसिद्ध पावभाजी…
भोर:भोर शहरातील ऐतिहासिक वाघजाई माता मंदिर येथे शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसत आहे. शारदीय उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.त्यामध्ये विशेषतः महाभोंडला,खेळ पैठणीचा आणि वेगवेगळ्या गावांचे भजन यानिमित्ताने आयोजित केले जात आहे.
उत्साहामध्ये भोर शहरातील युवक,स्त्रिया,पुरुष मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहेत.तसेच वाघजाई देवीचे नवरात्र उत्सवामध्ये विविध नामांकित खाद्यपदार्थांनचे स्टॉल, दुकाने तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी मोठे पाळणे,घोडे अश्या प्रकरचे व्यवसायिक परिसरात आलेले आहेत. संपूर्ण तालुक्यातून या ठिकाणी सहकुटुंब भाविक येत असतात.
या उत्साहात विशेषतः प्रमुख आकर्षण ठरत आहे ते भोरमधील आझाद मित्र मंडळ मंडळ संचलित सातारची सुप्रसिद्ध पावभाजी. या पावभाजीच्या चवीने येणारे भाविक तृप्त होत आहेत. या खाद्यपदार्थाचे स्टॉलवर मंडळाचे सर्व सभासद व कार्यकर्ते स्वतः काम करत असतात व त्यातून जो नफा मिळेल त्यातून हे मंडळ सामाजिक कार्य करत असतात. या उपक्रमात मंडळाचे सभासद बाळासाहेब शेटे,सोमनाथ सोनटक्के , सचिन धराशिवकर विशेष लक्ष देऊन काम करतात.तालुक्यात या मंडळाच्या कार्याचा सगळीकडे बोलबाला आहे. गेली १० वर्षे झाले हे मंडळ हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. मंगळवार (दि.२४) रोजी विजयादशमी दसरा दिवशी सायंकाळी ५ वाजता मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा होऊन भोर ग्रामस्थांतर्फे ढोल ताशाच्या मिरवणुकीत उत्सवाची सांगता होणार आहे.