ग्रामीण भागात देखील घडणार आंतरराष्ट्रीय खेळाडू…

भोर तालुक्यातील किकवी गावात गुरुकुल युनिक फिटनेस अकॅडमीची ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याची सुरुवात.

कापूरहोळ प्रतिनिधी : मंगेश पवार

किकवी:भोर तालुक्यातील किकवी गावामध्ये गुरुकुल युनिट फिटनेस अकॅडमीच्या तर्फे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याची सुरुवात गुरुवार (दि १९) रोजी विघ्नहर्ता पतसंस्था शेजारी विजय संकुल येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी सुनीता ताई चंद्रकांत बाठे (मा.सभापती पं.स. भोर) यांच्या शुभ हस्ते गुरुकुल युनिक फिटनेस अकॅडमी चे उद्घाटन समारंभ करण्यात आला.
या उद्घाटनासाठी सन्माननीय उपस्थिती मा.श्री. चंद्रकांत निवृत्ती बाठे (मा. आदर्श सदस्य, जि. प.पुणे) त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती प्रकाश भाऊ तनपुरे(सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस), काळूराम महांगरे(सचिव विघ्नहर्ता पतसंस्था आणि सदस्य ग्रामपंचायत सारोळे),नवनाथ कदम(सरपंच किकवी), विजय मोरे(सामाजिक कार्यकर्ते), कविता बाठे (सरपंच केंजळ), दिपाली मोरे(सरपंच मोरवाडी), निकिता आवाळे(सरपंच वागजवाडी), सचिन तनपुरे (सरपंच धांगवडी ), रूपाली धाडवे (सरपंच सारोळा), तुषार बापू मालपुरे सरपंच निगडे,पांडुरंग बाठे, संतोष खाटपे, हृदयनाथ बाठे, श्रीपत साळेकर,सागर भिलारे, नारायण भिलारे,आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

यावेळी चंद्रकांत बाठेंनी सांगितले की, कराटे मुळे अंग लौचिक बनते, शारीरिक स्वास्थ्य मिळते शरीर पिळदार व मजबूत शरीरयष्टी लाभते. आत्मविश्वास, ताकद व फोकस करण्याची शक्ती वाढते. कराटे शिका व भयमुक्त व्हा असा संदेश चंद्रकांत बाठे यांनी दिला.आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियन आणि प्रशिक्षक जितेंद्र भगत,किरण साळेकर सर यांनी कराटे शिकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध केली आहे.अकॅडमीचे प्रशिक्षक जितेंद्र भगत सर, किरण साळेकर सर, समीर शेख सर, संकेत साळुंखे , अदिती बाठे , निलम निकम मॅडम, पूर्वा मेमाणे मॅडम, या सर्व प्रशिक्षकांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page