राज्यात पोलीस अधीक्षक दर्जाच्या ४४ अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या जागी पंकज देशमुख तर अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या जागी संजय जाधव, संपूर्ण यादी पहा

पुणे : पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे व आनंद भोईटे या दोघांचीही पोलीस उपायुक्त बृह्नमुंबई येथे बदली करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वरिष्ठ पोलीस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत.

गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक असलेले पंकज देशमुख आता पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे अतिरिक्‍त नियंत्रक संजय जाधव बारामती विभागाचे नवीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. तर चाळीसगावचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारतील. तसेच कोकण परिक्षेत्र, नवी मुंबईचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीण पवार यांची पुणे शहराच्या पोलिस सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिका-यांच्या बदल्या होणार होत्या. शासनाने अध्यादेश जारी करत या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले.

राज्यातील ४४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या पुढीलप्रमाणेः
प्रभात कुमार (अतिरिक्त महासंचालक व उपमहासमादेशक, होमगार्ड मुंबई ते संचालक नागरी संरक्षण, मुंबई),
रवींद्र कुमार सिंगल (अतिरिक्त महासंचालक, वाहतूक, मुंबई ते पोलिस आयुक्त नागपूर शहर),
शिरीष जैन (सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबई ते आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई),
दीपक पांडे (विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभाग, मुंबई ते अतिरिक्त महासंचालक, महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभाग, मुंबई),
दत्तात्रेय कराळे (पोलिस सहआयुक्त, ठाणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र),
संजय शिंदे (पोलिस सहआयुक्त, पिंपरी चिंचवड ते विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे),
प्रवीणकुमार पडवळ (पोलिस सहआयुक्त, वाहतूक, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई)
संजय दराडे (विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण व खास पथके, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई),
ज्ञानेश्वर चव्हाण (विशेष पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र ते पोलिस सहआयुक्त, ठाणे शहर),
एस.डी. ऐनपुरे (विशेष पोलिस महानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण, मुंबई ते पोलिस सहआयुक्त, नवी मुंबई),
एन.डी. रेड्डी (पोलिस आयुक्त अमरावती ते पोलिस आयुक्त, अमरावती शहर-पदोन्नतीने),
संदीप पाटील (पोलिस उपमहानिरिक्षक, गडचिरोली परिक्षेत्र ते विशेष पोलिस महानिरीक्षक, नक्षल विरोधी अभियान, नागपूर),
वीरेंद्र मिश्रा (अतिरिक्त आयुक्त, विशेष शाखा, मुंबई ते विशेष पोलिस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र),
रंजन कुमार शर्मा (अतिरिक्त आयुक्त, उत्तर विभाग, पुणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)
नामदेव चव्हाण (पोलिस उपमहानिरिक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते विशेष पोलिस महानिरीक्षक, राज्य राखीव पोलिस बल, नागपूर),
राजेंद्र माने (पोलिस आयुक्त, सोलापूर ते सहसंचालक, महाराष्ट्र अकादमी, नाशिक),
विनिता साहू (समादेशक, राखीव पोलिस बल, दौंड, पुणे ते अतिरिक्त आयुक्त, संरक्षण व सुरक्षा, मुंबई),
एम. राजकुमार (पोलिस अधीक्षक जळगाव ते पोलिस आयुक्त, सोलापूर),
अंकित गोयल (पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते पोलिस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र),
बसवराज तेली (पोलिस अधीक्षक सांगली ते पोलिस उपमहानिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे),
शैलेश बलकवडे (समादेशक, राखीव पोलिस बल पुणे ते अतिरिक्त आयुक्त-गुन्हे पुणे),
शहाजी उमाप (पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण ते अतिरिक्त आयुक्त, विशेष शाखा, मुंबई),
एस.जी. दिवाण (समादेशक, राखीव पोलिस बल, कोल्हापूर ते पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस दळणवळण व माहिती तंत्रज्ञान, पुणे),
संजय शिंत्रे (पोलिस अधीक्षक, सायबर, मुंबई ते पोलिस उपमहानिरीक्षक, दक्षता, वस्तु व सेवा कर विभाग, मुंबई),

Advertisement

मनोज पाटील (पोलिस उपायुक्त, मुंबई ते अतिरिक्त आयुक्त, उत्तर विभाग, पुणे शहर),
विक्रम देशमाने (पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण ते पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण),
पंकज देशमुख (पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे ते पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण),
एम.सी.व्ही. माहेश्वरी रेड्डी (पोलिस उपायुक्त, मुख्यालय, मुंबई ते पोलिस अधीक्षक, जळगाव),
अजय कुमार बन्सल (पोलिस आयुक्त, मुंबई ते पोलिस अधीक्षक जालना),
रवींद्रसिंह परदेशी (पोलिस अधीक्षक, चंद्रपूर ते पोलिस अधीक्षक, परभणी),
रागसुधा आर. (पोलिस अधीक्षक, परभणी ते पोलिस उपायुक्त, मुंबई), संदीप घुगे (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते पोलिस अधीक्षक, सांगली),
मुमक्का सुदर्शन (पोलिस उपायुक्त, नागपूर शहर ते पोलिस अधीक्षक, चंद्रपूर),
धोंडोपंत स्वामी (पोलिस उपायुक्त, मुंबई ते पोलिस अधीक्षक, ठाणे ग्रामीण),
पंकज कुमावत (पदस्थापनेच्य प्रतीक्षेत ते अतिरिक्त पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण),
मितेश घट्टे (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण ते पोलिस उपायुक्त, मुंबई),
विक्रम साळी (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, अमरावती ग्रामीण ते सहायक पोलिस महानिरीक्षक, नियोजन व समन्वय, पोलिस महासंचालक कार्यालय मुंबई),
आनंद भोईटे (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, बारामती ग्रामीण ते पोलिस उपायुक्त, मुंबई),
संदीप पखाले (अतिरिक्त पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण ते पोलिस अधीक्षक, विशेष कृती गट, नक्षलवाद विरोधी अभियान, नागपूर),
रमेश धुमाळ (सहायक पोलिस महानिरीक्षक, नियोजन व समन्वय, मुंबई ते अतिरिक्त पोलिस अधीक्षक, नागपूर ग्रामीण),
समाधान पवार (सहआयुक्त (दक्षता) अन्न व औषध प्रशासन, मुंबई ते पोलिस उपायुक्त, मुंबई).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page