खेडशिवापुर, हवेली हद्दीत चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांची कारवाई… सुमारे ६,६४,५०० रूपये किमतीचे १५० ग्रॅम वजनाचे दागिने केले हस्तगत…
भोर: सप्टेंबर २०२३ या महिन्यात राजगड व हवेली पोलीस स्टेशन हद्दीत अपार्टमेंट मधील बंद सदनिकांमध्ये दिवसाचे घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले होते. याबाबत पोलीस अधीक्षक साो. पुणे ग्रामीण यांनी गुन्हयांची उकल करून आरोपी जेरबंद करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सर्व घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची पाहणी करता, सर्व घरफोडी चोरीचे गुन्हयांमध्ये बंद सदनिकांत दिवसा चोरी झालेली होती. त्या अनुषंगाने उपलब्ध सर्व गुन्हयांचे सीसीटीव्ही तपासणेत आले. त्याचप्रमाणे दिवसा घरफोडी करणारे रेकॉर्डवरील आरोपींची सद्यस्थितीची माहिती घेतली असता, सप्टेंबर २०२३ चे पहिल्या आठवडयात जामीनावर बाहेर आलेला सराईत गुन्हेगार यानेच घरफोड्या केल्याचे तपासात पुढे आले. बातमीदारांकडून प्राप्त झालेल्या माहितीचे आधारे संशयित सराईत गुन्हेगारावर स्था.गु.शा.चे पथकाने नजर ठेवणेस सुरूवात केली. दि.१५ नोव्हेंबर रोजी संशयित सराईत गुन्हेगार हा खडकवासला परीसरातील धरण चौकाजवळ बसलेला आहे, अशी बातमी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्याने त्यास सापळा लावून ताब्यात घेतले असता, त्याने त्याचे नाव अतुल ऊर्फ अन्या चंद्रकांत आमले (वय २८ वर्षे), रा. आकाशनगर, अशोक गोडांबे, वारजे, यांचे खोलीत. पुणे असे असल्याचे सांगून त्यानेच खेड शिवापूर, नांदेडगाव, डोणजे परीसरात दिवसा घरफोडी चोरीचे गुन्हे केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अतुल आमले याचेवर वेगवेगळया जिल्ह्यात घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल असून तो दि ०३ सप्टेंबर २०२३ रोजी जामीनावर सुटलेला आहे. अशी माहिती त्यांना मिळाली. सराईत गुन्हेगार असल्याने त्याने जामीनावर सुटलेनंतर लागलीच दि. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी खेड शिवापूर परीसरातील बंद सदनिकामध्ये चोरी केली व त्यानंतर नांदेडगाव, डोणजे, हिंजवडी परीसरात घरफोडी चोरीचे गुन्हे केले आहेत. आरोपी अतुल चंद्रकांत आमले याचेकडून ०९ गुन्हे उघडकीस आले असून त्याचेकडून गुन्हयांतील चोरी गेलेले ६,६४,५०० रुपये कि.चे सुमारे १५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्हयात वापरलेली ॲक्टीव्हा मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे. आरोपी अतुल आमले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर कोथरूड, वारजे, दत्तवाडी, अलिबाग, रावेत पो स्टे ला यापुर्वीचे सुमारे २३ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अंकित गोयल, सो. पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे साो. पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, राजगड पोस्टे चे पोनि आण्णासाहेब घोलप, हवेली पोस्टे चे पोनि सचिन वांगडे, स्थागुशा चे पथकातील स.पो.नि. नेताजी गंधारे, पो.स.ई प्रदीप चौधरी, पोलीस अंमलदार सचिन घाडगे, राजू मोमीण, अतुल डेरे, चंद्रकात जाधव, मंगेश थिगळे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, धिरज जाधव, मंगेश भगत, प्राण येवले, हेमंत विरोळे, दत्ता तांबे, समाधान नाईकनवरे, बाळासाहेब खडके, अक्षय सुपे, राजगड सपोनि नितीन खामगळ, पौना सोमनाथ जाधव, हवेली पोस्टे चे सपोनि सागर पवार यांनी केली असून पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन करत आहे.