धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई, वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या पुण्यभूमी मध्ये प्रथमच वर्षी दुर्गामाता दौड…
कापुरहोळ : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या पुण्यभूमी कापूरहोळ(ता.भोर) येथे प्रथमच वर्षी दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले.मोठ्या उत्साहात ही दौड रविवार(दि.२२) रोजी सकाळी काढण्यात आली.वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या स्मारकापासून या दौड ला सुरुवात झाली.संपूर्ण गावात ही दौड काढण्यात आली.विश्वास कॉलनी पासून शिवाजीनगर तिथून धाराऊ माता स्मारक वाडा पर्यंत ही दुर्गा दौड पार पडली. या दौड चे हे प्रथमच वर्ष होते. यामुळे गावातील सर्व महिला, लहान मुले,तरूण मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.संपूर्ण दौड झाल्यावर धाराऊ माता गाडे पाटील स्मारक वाडा या ठिकाणी दुर्गा माता दौडची शिव वंदना व आरती घेऊन दुर्गा माता दौड ची सांगता झाली. उपस्थित वेळेस पांडुरंग गाडे पाटील संतोष गाडे, मयुर गाडे, अमर गाडे,सागर गाडे,आक्षय गाडे आणि तरुण वर्ग व महिला उपस्थित होत्या. दुर्गा माता दौड चे सर्व नियोजन सई गाडे पाटील मयुरी गाडे पाटील यांनी केले होते.