भोर तालुक्यातील भोलावडे येथे आदर्श नगरसेवक आरोग्यदुत किरणदादा दगडे पाटील यांच्या तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर

भोर : भोलावडे (ता.भोर)गावामध्ये आज शनिवार (दि.२८ऑक्टोबर) रोजी भोर भाजपा विधानसभा प्रमुख व पुणे मनपा आदर्श नगरसेवक किरणदादा दगडे पाटील यांच्या तर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर मोफत आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उदघाटन भोलावडे गावचे सरपंच प्रवीण जगदाळे,राहुलदादा दगडे पाटील,तालुका अध्यक्ष जीवनआप्पा कोंडे तसेच युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरामध्ये एकूण ७०० लोकांनी नेत्र तपासणी केली त्यापैकी ५५० लोकांना मोफत चष्मे देण्यात आले व 72 लोकांचे नेत्रबिंदू शत्रक्रिया मोफत केली जाणार असल्याची माहिती युवा मोर्चा अध्यक्ष अमर बुदगुडे यांनी दिली.संपूर्ण तालुक्यामध्ये किरण दादा दगडे पाटील युवा मंच कडून साधारणतः ३५००० लोकांची मोफत तपासणी करणार असल्याचे भोर विधानसभा प्रमुख किरणदादा दगडे पाटील यांनी सांगितले या शिबाराला राहुलदादा दगडे पाटील,भोर तालुका अध्यक्ष जीवनआप्पा कोंडे,भोलावडे गावचे सरपंच प्रवीण जगदाळे,उपसरपंच अविनाश आवाळे, माजी उपसरपंच गणेश आवाळे,उपाध्यक्ष अमोल पिलाने,दीपक मालुसरे,किरण दानवले,सदस्य प्रशांत पडवळ,मंगेश आवाळे, बंडा तारू, तंटामुक्ती अध्यक्ष गजानन आवाळे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष दत्तात्रय अब्दागिरे,नितीन आवाळे, नागेश बदक,निलेश गावडे,सागर खुंटवड, रोशन सावंत,माऊली आवाळे, निलेश जाधव,दत्तात्रय खोपडे,अजय गुंड पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page