चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी सिंहगड रोड पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : सिंहगड रोड पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना गजाआड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३०च्या दरम्यान घरफोडी झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पहाटे ४ वाजेपर्यंत अज्ञात आरोपींनी दागिने, मोबाईल फोन व रोख असा एकूण १,०७,८०० रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला.

Advertisement

तक्रारीवरून सिंहगड रोड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस हवालदार सागर शेडगे व देवा चव्हाण यांना व्हिजन क्रिकेट अकादमी, दौलतनगर, आनंदनगर जवळ मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात सहभागी आरोपी हे चोरीचे मोबाईल विकण्यासाठी निळ्या रंगाच्या स्कूटरने नवले ब्रिज सर्व्हिस रोड जवळ येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली.  तर एका आरोपीने पांढरा शर्ट आणि काळी जीन्स तर दुसऱ्याने पांढरी पँट आणि काळा शर्ट घातलेला आहे, असे समजले त्यानुसार पोलिसांनी नवले पूल परिसरात सापळा रचून सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले. शिवराज गणेश साखरे (वय १९, रा. शिव अपार्टमेंट, आंबेगाव आणि ज्ञानेश्वर सुरवसे (वय १९, रा. शुभश्री अंगण, आंबेगाव पठार) असे आरोपिंचे नाव आहे. पोलीस कोठडीत अधिक तपास केला असता, आरोपींनी कलम ३९४, ३४१, ३५२, ५०६ आणि ३४ नुसार नोंदवलेल्या घरफोडीच्या तक्रारीत सहभाग असल्याचे उघड झाले. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता (IPC) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७(१)१३५ नुसार नोंद करण्यात आली असून पोलिसांनी आरोपींकडून १,४८,००० रुपयांचा चोरीचा माल जप्त केला असून या प्रकरणाचा तपास सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन निकम करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page